गुप्ता गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) आधी ८ एप्रिलला सांगलीत रुजू झाले होते.
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता (Shubham Gupta) यांची बदली झाली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) व्ही. राधा यांनी याबाबतचे पत्र दिले आहे. या पत्रात सदस्य सचिव विदर्भ वैधानिक विकास मंडळ नागपूर या रिक्त पदावर झाली असून, सध्याच्या पदाचा कार्यभार प्रधान सचिव (२) नगर विकास विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार स्वीकारावा, असे म्हटले आहे.