Sangli Mahanagarpalika Bharti : महापालिकेत भरतीचा मार्ग मोकळा; टाटा कन्सल्टन्सीला दिला कंत्राटाचा कार्यादेश, 82 रिक्त पदांपैकी 41 पदांसाठी भरती

TCS to Handle Sangli Municipal Corporation Recruitment : सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेतील ४१ तांत्रिक रिक्त पदांच्या भरतीसाठी TCS नियुक्तीला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
Sangli Municipal Corporation Recruitment

Sangli Municipal Corporation Recruitment

esakal

Updated on

सांगली : सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेतील सरळ सेवा भरती प्रक्रियेअंतर्गत टाटा कन्सल्टन्सीकडे देण्याचा कार्यादेश आज देण्यात आला. स्थायी समितीच्या सभेत सर्वानुमते निर्णय झाला. सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. बैठकीत भरती प्रक्रियेसाठी कंपनीसोबत करारपत्र करण्यास आणि पदभरतीच्या खर्चास मंजुरी देऊन हा ठराव अंतिम मान्यतेसाठी १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महासभेकडे पाठवण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी महासभेत या विषयावरून वादळी चर्चा होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com