
सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेकडून आज तिन्ही शहरांत विशेष स्वच्छता मोहीम घेण्यात आली. यामध्ये १२०० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आणि एकूण १५ टन कचरा संकलित करण्यात आला. लोक आणि प्रशासनाच्या सहभागाने स्वच्छता मोहीम सर्वव्यापी आणि यशस्वी करणार असल्याचे आयुक्त शुभम गुप्ता यांनी सांगितले.