Sangli mayor warning to municipal commissioner
esakal
सांगली : ‘‘तुम्ही अधिकाऱ्यांना ताळ्यावर आणा, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने अधिकाऱ्यांना हाताळू. त्यावेळी तुम्ही मध्ये पडू नका.’’ असा इशारा महापौर धीरज सूर्यवंशी यांनी आयुक्त संजिता महापात्र यांना (Sangli Municipal Corporation general body meeting) दिला. प्रत्येक विषयात प्रशासन आडकाठी आणत आहे, अशी तक्रार नगरसेवकांनी केल्यामुळे महासभेत महापौर आक्रमक झाले होते. महापालिकेची तहकूब महासभा आज झाली. ‘एमआरडीपी’, अजेंड्यावरील विषय सुरू असतानाच खुद्द महापौरांनीच प्रशासन आणि नगरसेवक यांच्यातील वादाला वाचा फोडली.