Ajit Pawar
esakal
पश्चिम महाराष्ट्र
Ajit Pawar : 'अजितदादा सत्तास्थापनेबाबत जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल'; राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत महत्त्वाची चर्चा
Ajit Pawar Holds Final Authority on Sangli Municipal Power : सांगली महापालिकेतील सत्तास्थापनेबाबतचा अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार असून तोच निर्णय पक्षासाठी बंधनकारक राहणार असल्याचे बैठकीत स्पष्ट झाले.
सांगली : ‘महापालिकेत सत्तास्थापनेबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना असून ते घेतील तो निर्णय अंतिम असेल,’ अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आली. पक्षाचे नेते आणि नूतन १६ नगरसेवक या वेळी उपस्थित होते.
