esakal | स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सांगली  महापालिका राज्यात 9 व्या क्रमांकावर 
sakal

बोलून बातमी शोधा

mahapalika.jpg

सांगली-  यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सांगली महानगरपालिकेने चांगली कामगिरी केली आहे. पाच लाख लोकसंख्येच्या गटात महानगरपालिरेने देशपातळीवर 36 वा क्रमांक आणि राज्यपातळीवर नववा क्रमांक पटकावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे आज निकालाची घोषणा करण्यात आली. कोरोना पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सांगली  महापालिका राज्यात 9 व्या क्रमांकावर 

sakal_logo
By
जयसिंग कुंभार

सांगली-  यंदाच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत सांगली महानगरपालिकेने चांगली कामगिरी केली आहे. पाच लाख लोकसंख्येच्या गटात महानगरपालिरेने देशपातळीवर 36 वा क्रमांक आणि राज्यपातळीवर नववा क्रमांक पटकावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्ली येथे आज निकालाची घोषणा करण्यात आली. कोरोना पार्श्‍वभूमीवर ऑनलाइन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला आहे. 

महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कचरा व्यवस्थापन, कचरा उठाव, कचरा विलगीकरण, सार्वजनिक शौचालय स्वच्छता, सार्वजनिक सौंदर्यीकरण, विद्यार्थी आणि नागरिक सहभाग, स्वच्छता ऍप, सार्वजनिक स्वच्छता, कचरा घंटागाड्या, कचरा कोंडाळी, पाणी व्यवस्थापन, सांडपाण्याचा पुनर्वापर, घातक कचरासह इतर प्रकार आणि त्यावरील प्रक्रिया, झोपड्यपट्ट्या व्यवस्थापन आणि सुशोभीकरण, सार्वजनिक पाणवठे यांची स्वच्छता आदी विविध क्षेत्रांत चांगली कामगिरी केली आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण ही दरवर्षी घेण्यात येणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची देशव्यापी स्पर्धा असते. यात वरील घटक आणि कागदपत्रे दिल्लीच्या टीम कडून तपासले जातात. यावर्षी नागरिकांनी महापालिकेला स्वच्छता विषयक उपक्रमांना भरभरून पाठिंबा दिला आहे. त्यांच्या पाठींबा आणि सहभागामुळे महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणात अग्रेसर राहिली आहे. यंदाच्या वर्षी महानगरपालिकेला अजून चांगली कामगिरी करण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग आणि पाठींबा देऊन आपले शहर देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून नावलौकीक वाढवावा, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे. उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरोग्याधिकारी सुनील आबोळे, रवींद्र ताटे यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्याचा मोहिमेत सहभाग होता. गेल्या दोन वर्षे देशपातळीवर महानगरपालिकेचा अनुक्रमे 119 आणि 106 क्रमांक मिळाला होता.  
 
loading image
go to top