Sangli Election : लोकसभेच्या विजयाची जादू कायम; सांगली महापालिका निवडणुकीत ‘लिफाफा’ चिन्हाला प्रचंड मागणी
Envelope Symbol : घरगुती वापरातील व रोज दिसणाऱ्या वस्तूंची चिन्ह मतदारांच्या लक्षात पटकन राहतात, म्हणूनच उमेदवार त्यांनाच प्राधान्य देताना दिसतात, लोकसभा निवडणुकीतील अपक्ष विजयामुळे ‘लिफाफा’ या चिन्हालाअभूतपूर्व मागणी
सांगली : गत लोकसभा निवडणुकीत लिफाफा चिन्ह घेऊन विशाल पाटील यांनी अपक्ष विजय मिळवला. एखाद्या चिन्हाचे गारुड किती असते, याची झलक आता सांगली महानगरपालिका निवडणुकीत दिसत आहे.