सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक निर्भय, मुक्त व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून यंत्रणा राबवली जात आहे. .याच पार्श्वभूमीवर नवनियुक्त मुख्य निवडणूक निरीक्षक कार्तिकेयन एस. यांनी आज येथे निवडणूक यंत्रणेचा आढावा घेतला. पाहणी दौऱ्यावेळी महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी सत्यम गांधी यांच्यासह निवडणूक निरीक्षक संजय शिंदे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त (निवडणूक) अश्विनी पाटील, उपायुक्त स्मृती पाटील, तसेच सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते..Kolhapur Muncipal : निवडणूक आचारसंहिता भंग खपवून घेतला जाणार नाही; सोशल मीडियावर प्रशासनाची करडी नजर.मुख्य निवडणूक निरीक्षकांनी दौऱ्यात निवडणुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी दिल्या. मिरजेतील सेंट्रल वेअरहाऊस येथे ईव्हीएम यंत्रांची साठवणूक, स्ट्राँग रूमची सुरक्षा, सीसीटीव्ही, अग्निशमन व्यवस्था व सशस्त्र पोलिस बंदोबस्ताची पाहणी केली..महानगरपालिकेच्या सहा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांना भेटी देत नामनिर्देशन छाननी प्रक्रिया, मनुष्यबळ नियोजन व तांत्रिक सज्जतेचा आढावा घेतला. आचारसंहिता कक्षातील प्राप्त तक्रारी, त्यावरील कार्यवाही, तसेच एफएसटी, एसएसटी पथकांच्या कामकाजाची माहिती घेतली. आयुक्त सत्यम गांधी यांनी मतदारजागृती उपक्रमांची माहिती दिली..Sangli Muncipal : महापालिका निवडणुकीसाठी जय्यत तयारी; चारशे कर्मचाऱ्यांना ईव्हीएम प्रशिक्षण.निरीक्षक संजय शिंदे यांनी तांत्रिक बाबींच्या अचूक अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. उमेदवारांना समान संधी द्या कार्तिकेयन एस. मुख्य निवडणूक निरीक्षक कार्तिकेयन एस. यांनी पाहणीनंतर आढावा बैठक घेतली. .यात सर्व राजकीय पक्ष व अपक्ष उमेदवारांना नियमांनुसार समान संधी व परवानग्या मिळतील, याची काटेकोर अंमलबजावणी करा. ‘शॅडो रजिस्टर’द्वारे खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून आर्थिक गैरप्रकारांवर कठोर कारवाई करा. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, रॅम्प, वीज व स्वच्छतागृह यांसारख्या किमान सुविधा ३ जानेवारीपूर्वी सुनिश्चित कराव्यात, अशा सूचना त्यांनी दिल्या. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.