

Party workers mobilise voters outside polling booths during Sangli municipal elections.
sakal
सांगली : गेल्या दहा दिवसांत प्रचारात हवा तसा जोश भरला नव्हता. मरगळ आलीय की काय, असं वाटावं इतका थंड प्रचार सुरू होता. ना मोठ्या सभा, ना गंभीर आरोप, ना उत्तर-ना प्रत्युत्तर. प्रत्येकाने आपला प्रभाग सांभाळला. शहराच्या अंगात निवडणुकीचं वार भरलंच नाही. परिणाम आज दिसला. मतदार घरातून बाहेर पडायलाच तयार नाही. गर्दी होईना.