

BJP leaders react after the party narrowly misses majority in Sangli municipal elections.
sakal
सांगली : भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महापालिकेत मोठे बहुमत मिळवण्याच्या उद्देशाने काँग्रेसमधून दिग्गजांना पाचारण केले. मात्र तरीही त्यांचा वारू महापालिका निवडणुकीत बहुमताच्या काठावरच थांबला. उमेदवारी देण्यापासूनच गटा-तटाचे राजकारण दिसून आले. त्याचा परिणाम निकालावर झाल्याचे आज मतमोजणीनंतर समोर आले.