सांगली : शाळेचे लोखंडी गेट डोक्यात पडून पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

  • लोखंडी गेट डोक्यात पडल्याने पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू
  • नागेवाडी ( ता. खानापूर ) येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात आज दुपारी एकच्या सुमारास घटना
  • वेदांत मनोज कारंडे असे मृताचे नांव. 

विटा - लोखंडी गेट डोक्यात पडल्याने पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.  नागेवाडी ( ता. खानापूर ) येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात आज दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. वेदांत मनोज कारंडे असे त्याचे नांव आहे. 

नागेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेच्या खोल्यानजीक अंगणवाडी आहे. त्या अंगणवाडीत वेदांत शिकत होता. शाळेला काही दिवसापूर्वीच लोखंडी गेट उभारले आहे. आज दुपारी भोजनाची वेळ झाल्यानंतर मुलांना भाताचे वाटप सुरू होते. त्यावेळी अंगणवाडीतील काही मुले खेळत होती. वेदांतही गेटच्या दरवाज्याजवळ खेळत असताना गेटचे वेल्डींग तुटून वेदांतच्या डोक्यात पडले. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी त्यास विटा येथील ओमश्री हॉस्पीटलमध्ये उपचारास आणले होते. परंतु जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे त्याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

शवविच्छेदनासाठी वेदांतला विटा ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. त्याठिकाणी वेदांतचे वडील, आई, सहा वर्षाच्या बहिणीसह नातेवाईकांनी आक्रोश केला. शवविच्छेदनानंतर वेदांतचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli Nagewadi Five-year-old boy dies after falling school iron gate on him