आटपाडी : सांगली जिल्ह्यातील नेलकरंजी (ता. आटपाडी) गावात एक धक्कादायक घटना घडली असून, केवळ नीटच्या सराव परीक्षेत (NEET Student Death) कमी गुण मिळाल्याच्या कारणावरून वडिलांनी आपल्या मुलीला लाकडी खुंट्याने अमानुषपणे मारहाण केली. या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी वडील धोंडीराम भोसले यांना अटक केली आहे. ते गावातील माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत.