विटा पालिका कामकाजात वैभव पाटलांचा हस्तक्षेप

प्रताप मेटकरी
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

विटा -  विटा नगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजात सत्ताधारी गटाचे स्वीकृत नगरसेवक वैभव पाटील यांचा हस्तक्षेप होत आहे. पालिकेचे अधिकारी, कर्मचारी व मुख्याधिकारी त्यांच्या दबावाखाली काम करीत आहेत. त्यामुळे पालिकेचे अधिकारी व  कर्मचारी हे सत्ताधारी गटाच्या हातचे बाहुले बनले असल्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे होत नाहीत. याउलट त्यांची अडवणूक व पिळवणूक होत आहे, असा घणाघाती आरोप विरोधी गटाचे शिवसेनेचे नगरसेवक अमर शितोळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष संजय भिंगारदेवे, शिवसेनेचे शहराध्यक्ष राजू जाधव, समीर कदम, आय्याज मुल्ला, अभिषेक बाबर उपस्थित होते. विटा पालिकेतील सताधारी गटाच्या मनमानी व हुकूमशाही कारभारात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन सुधारावा, अशी मागणी केली.

अमर शितोळे म्हणाले, ‘‘पाच लोकांच्या जागेच्या रेखांकनाचे पैसे भरून घ्यावेत, असे आदेश मुख्याधिकाऱ्यानी दिले आहेत. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून ते लोक संबंधित अधिकाऱ्यांकडे  सातत्याने पाठपुरावा करत होते. परंतु त्यांना दाद दिली जात नव्हती. त्यामुळे अखेर मी स्वतः ५ जानेवारी रोजी त्या संबंधित लोकांना घेऊन पालिकेत गेलो. त्यावेळी दुपारी दोन वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत आता  करतो, मग करतो, असे सांगत वेळ मारून नेली. सायंकाळी पाच वाजता सहायक नगररचनाकार मुनीर पिरजादे आणि बांधकाम विभागाचा लिपिक कुशाल पवार या दोघांनी आमच्याकडील चलनाची कागदपत्रे घेऊन आता येतो म्हणून जे गेले, ते पालिकेत परतलेच नाहीत.

मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी त्या दोघांना फोन करून संबंधितांचे चलन भरून द्या, असा आदेशही दिला होता. परंतु हे दोघेही गायबच होते. त्यामुळे जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर रात्री सव्वानऊ वाजता मुख्याधिकारी सांगलीहून आल्यानंतर पैसे भरून घेतले गेले, यावरून पालिकेचा भोंगळ कारभार लक्षात येतो. त्यामुळे संबंधित त्या दोघांचे निलंबन व्हावे, अशी आमची मागणी आहे. गेल्या ४ महिन्यांपासून झिरो पेंडन्सी, स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या नावाखाली एकही अधिकारी व कर्मचारी पालिकेत पूर्ण उपस्थित नसतो. त्यामुळे पालिकेचे प्रशासकीय कामकाज पूर्णपणे बंद असल्यामुळे जनतेची गैरसोय होत आहे.’’

Web Title: Sangli News Amar Shitole Press