एकता रॅलीला गेलेली ऐश्‍वर्या परतलीच नाही..! 

अमोल गुरव
रविवार, 14 जानेवारी 2018

सांगली - ग. रा. पुरोहित कन्या शाळेत शिकणारी ऐश्‍वर्या सकाळी मैत्रिणींसोबत मोठ्या उत्साहाने एकता रॅलीला निघाली होती...तिने रॅली पूर्ण केली... रविवारची सुटी दंगामस्ती करत घालवायची या विचाराने घरी निघाली होती... पण, एका क्षणाला तिला चक्कर आली, तिने उलटी केली... क्षणांर्धात रुग्णवाहिका दाखल झाली,  पण, वेळ झाला होता... ऐश्‍वर्याने या जगाचा निरोप घेतला होता. 

सांगली - ग. रा. पुरोहित कन्या शाळेत शिकणारी ऐश्‍वर्या सकाळी मैत्रिणींसोबत मोठ्या उत्साहाने एकता रॅलीला निघाली होती... भारत माता की जय'चा जयघोष देत तिने रॅली पूर्ण केली... राष्ट्रगीत संपवून ती रविवारची सुटी दंगामस्ती करत घालवायची या विचाराने घरी निघाली होती... पण, एका क्षणाला तिला चक्कर आली, तिने उलटी केली... क्षणांर्धात रुग्णवाहिका दाखल झाली, तिला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले... पण, वेळ झाला होता... ऐश्‍वर्याने या जगाचा निरोप घेतला होता. 

ऐश्‍वर्या शशिकांत कांबळे ही चौदा वर्षाची मुलगी. गुलाबी, पांढऱ्या रंगाचा शाळेचा गणवेश परिधान करून रॅलीत आली होती. सांगली जिल्हा प्रशासनाने माणुसकीचा, एकीचा संदेश देण्यासाठी ही रॅली घेतली होती. त्यात हजारो लोक सहभागी झाले होते. हजारो विद्यार्थीनी होत्या. त्यात ऐश्‍वर्याही उत्साहाने सहभागी झाली होती. सकाळी साडेनऊला रॅली सुरु झाली आणि सव्वाअकराला संपली. त्यानंतर स्टेशन रोडने घरी जात असताना या रस्त्यावरील विठ्ठल मंदीरासमोर ऐश्‍वर्याला गरगरले. उटली झाली. ती थांबली, सोबत वडील होते. तोवर रुग्णवाहिका आली. त्यातून तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिची प्राणज्योत मालवली होती. शासकीय रुग्णालयात जिल्हाधिकारी विजयकुमार काळम, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यासह अधिकाऱ्यांनी धाव घेतली. या घटनेने सारेच सुन्न झाले.

Web Title: Sangli News Death of Aishwarya after Ekta rally