
तासगाव : विधानसभेच्या निकालानंतर शहर, तसेच तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला असून त्यांना आता नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीचे वेध लागले आहेत. विधानसभा निवडणुकीत संजय पाटील गटाला मोठा फटका बसला असून कार्यकर्ते आपलं चुकलं कोठे, याचे चिंतन करताना दिसत आहेत.