वारणा कालवा प्रकल्पाबाबत फेरविचार न केल्यास जनआंदोलन - मानसिंगराव नाईक

शिवाजीराव चाैगुले
मंगळवार, 14 नोव्हेंबर 2017

शिराळा - अपूर्ण असणारा वारणा कालवा प्रकल्प पूर्ण झाल्याची चुकीची माहिती जलसंपदा विभागाने पंतप्रधान कार्यालयास दिली आहे. त्यामुळे या प्रकल्प पूर्णत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ह्या प्रकल्पाबाबत शासनाने फेरविचार न केल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिला.

स्थानिक आमदारांना या प्रकल्पापेक्षा मंत्रीपदाची विवंचना जास्त असल्याची टीका नाईक यांनी आमदार शिवाजीराव नाईक यांचे नाव न घेता केली.

शिराळा - अपूर्ण असणारा वारणा कालवा प्रकल्प पूर्ण झाल्याची चुकीची माहिती जलसंपदा विभागाने पंतप्रधान कार्यालयास दिली आहे. त्यामुळे या प्रकल्प पूर्णत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ह्या प्रकल्पाबाबत शासनाने फेरविचार न केल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिला.

स्थानिक आमदारांना या प्रकल्पापेक्षा मंत्रीपदाची विवंचना जास्त असल्याची टीका नाईक यांनी आमदार शिवाजीराव नाईक यांचे नाव न घेता केली.

चिखली (ता.शिराळा) येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी नाईक म्हणाले," जलसंपदा विभागाच्या या चुकीच्या अहवालामुळे कालव्याच्या प्रवाही सिंचनापासून शेकडो शेतकरी वंचित रहाणार आहेत. या कालव्यावर ८० मीटर उंचीच्या २५ उपसा जलसिंचन योजना असून त्यांची कामे थांबणार आहेत. या प्रकल्पांतर्गत ७० किलोमीटरच्या डाव्या कालव्याचे ३८ किलोमीटरचे तर ६०किलोमीटरच्या उजव्या कालव्याचे ३०किलोमीटर पर्यंत काम पूर्ण झाले आहे. अजून अनेक ठिकाणी कालव्यास गळती असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक झाल्या आहेत. काही ठिकाणी कालव्यावरील साकवांची  कामे करावयाची आहेत. हा अपूर्ण प्रकल्प कागदावर पूर्ण झाल्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केल्याने या कालवा परिसरातील शेतकरी अडचणीत येणार आहे. "

ते पुढे म्हणाले," या प्रकल्पासाठी एक वर्षापूर्वी सुधारित मान्यता घेतली असताना अधिकाऱ्यांनी असा अशी खोटी माहिती देऊन अन्याय केला हे दुर्दैव्य आहे. ज्यांना तीन वर्षात वाकुर्डे साठी एक रुपयाचा निधी आणता आला नाही, ते तीन महिन्यात काय करणार. उलट मी आमदार असताना १२० कोटींचा निधी आणून कामांना गती दिली होती. जलसंपदा विभागाने कोणत्या आधारे हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगितले, असे असेल तर आमदारांनी त्याठिकाणी जाऊन काय केले याचे उत्तर जनतेला द्यावे."

२५ उपसासिंचन योजना
मणदूर, मणदूर-सोनवडे, सोनवडे-काळोखेवाडी, सोनवडे-आरळा, आरळा-भास्टेवाडी-करुंगली, काळुंद्रे-खराळे-चिंचेवाडी, कदमवाडी-कुसळेवाडी-पणुब्रे, पणुब्रे -चरण, नाठवडे-येळापुर-मेणी, खिरवडे-हातेगाव, धसवाडी-विरवाडी-कुसाईवडी,बिळाशी-धसवाडी-दुरंदेवाडी-कुसाईवाडी, मांगरुळ-मोरेवाडी-शिंदेवाडी-बेलेवाडी, रिळे-पावलेवाडी,रिळे-पावलेवाडी-फुफिरे, शिराळे खुर्द-पुनवत, पुनवत-कणदूर, कणदूर, भागाईवाडी-नाटोली, नाटोली-चिखली, चिखली-भाटशिरगाव-कांदे, कांदे, कांदे-मांगले-भाटशिरगाव-बिऊर-उपवळे-तडवळे, मांगले-चिखलवाडी-इंगरुळ-फकिरवाडी-जांभळेवाडी-लादेवाडी-शिराळा-कापरी-रेड-खेड-औंढी-निगडी-पाडळेवाडी- अंत्री बुद्रुक-भटवाडी-शिवणी अशा २५ उपसा जलसिंचन योजना या प्रकल्पावर असून त्या पैकी प्रायोगिक तत्वावर काळुंद्रे योजनेचे काम सूर करण्यात आले.परंतु तीही योजना अपुर्ण अवस्थेत आहे.

Web Title: Sangli News Mansinghrao Naik Press