कुणाला तरी बरं वाटावं म्हणून टेंभूबाबत टीका करू नका  - आमदार बाबर

प्रताप मेटकरी
मंगळवार, 19 जून 2018

विटा - खासदारांनी कुणाला तरी बरे वाटावे म्हणून टेंभूबाबत माझ्यावर टीका करण्यापेक्षा आता आपण ज्या पदावर आहात त्या कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदाच्या जबाबदारीने माहिती घेऊन खरे बोलावे, असे आवाहन आमदार अनिल बाबर यांनी खासदार संजय पाटील यांना केले.

ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. श्री. बाबर पुढे म्हणाले, कुणाला बरे वाटो किंवा चुकीचे वाटो. मी जनतेसाठी आणि टेंभू योजनेच्या पूर्णत्वासाठी अहोरात्र काम करीत राहणार. चुकीच्या माहितीवर आधारित माझ्यावर टीका करू नका. गरज असेल तर टेंभूबाबत कुणी प्रयत्न आणि काम केले याची माहिती घ्या. पाहिजे तर एकाच स्टेजवर येऊन तुम्ही त्या मंडळींना बोलावून समोरासमोर करायची आपली तयारी आहे, असेही जाहीर आव्हान आमदार अनिल बाबर यांनी खासदार संजय पाटील यांना दिले.

Web Title: Sangli News MLA Anil Babar comment