सम्राट महाडिक यांना भाजपने उमेदवारी दिली नाही तर ते स्वाभिमानकडून लढतील - नीतेश राणे

शिवाजीराव चाैगुले
रविवार, 25 मार्च 2018

शिराळा - शिराळा विधानसभा मतदार संघात आत्ता भाकरी परतवण्याची वेळ आली आहे. भाजपने सम्राट महाडिक यांना उमेदवारी दिली नाही तर स्वाभिमानचे उमेदवार म्हणून सम्राट  यांना उभे करू अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी देऊन सम्राट महाडीक यांचा शिराळाचे भावी आमदार असा उल्लेखही त्यांनी केला. 

शिराळा - शिराळा विधानसभा मतदार संघात आत्ता भाकरी परतवण्याची वेळ आली आहे. भाजपने सम्राट महाडिक यांना उमेदवारी दिली नाही तर स्वाभिमानचे उमेदवार म्हणून सम्राट  यांना उभे करू अशी ग्वाही आमदार नितेश राणे यांनी देऊन सम्राट महाडीक यांचा शिराळाचे भावी आमदार असा उल्लेखही त्यांनी केला. 

येथील साई संस्कृती मंगल कार्यालयात महाडिक युवा शक्ती फाऊंडेशनच्यावतीने नोकरी मेळाव्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात शिराळ्याच्या राजकारणात बदलाचे संकेत दाखवून श्री. राणे यांनी खळबळ माजवली. त्यास खासदार धनंजय महाडिक यांनी दुजोरा दिला आहे.

राणे म्हणाले, " हाताला काम व कुटुंबाला आधार देण्याचे काम  करतो तोच खरा लोकप्रतिनिधी असतो. आपल्या सामाजिक कार्यातुन युवकांना संघटित करण्याचे काम सम्राट महाडीक यांनी केले आहे. या पुढील काळात त्यांच्या हातून चांगले काम करण्यासाठी त्यांना २०१९ ला पाठबळ देऊन काम करण्याची संधी द्या. नोकरी करा पण नोकरी देणाऱ्याला विसरू नका.

सध्याच्या युवकांचा सोशियल मीडियावर जास्त वेळ जात आहे. त्यांनी भाकरी मिळवून देणाऱ्या ज्ञानासाठी जास्त वेळ देण्याची गरज आहे. त्यासाठी दर्जेदार शिक्षण महत्वाचे आहे. भविष्य घडवण्यासाठी गाव पर्यायाने देश सोडण्याची मानसिकता ठेवावी. शेतीचे क्षेत्र कमी होत असल्याने नोकरी शिवाय पर्याय नाही.

-  धनंजय महाडिक, खासदार

प्रास्ताविक सम्राट महाडीक यांनी केले. यावेळी ज्ञानेश्वर बाबर, सी. बी. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. नानासाहेब महाडीक, महादेव कदम, रणजितसिंह नाईक, अमित ओसवाल, कपिल ओसवाल, केदार नलवडे, राहुल महाडिक, जगन्नाथ माळी, उपनगराध्यक्ष कीर्तीकुमार पाटील, अमर पाटील, प्रा. सम्राट शिंदे, विशाल घोलप उपस्थित होते. सूत्रसंचालन विजय कडणे यांनी केले. आभार हरून शेख यांनी मानले.

तुमचं आमचं सेम
शिराळ्यात महाडिकांची सर्वांना गरज असते पण त्यांना मदत हवी असते तेंव्हा सर्वांचा त्यांना विरोध होतो. तीच स्थिती आमच्या कोकणात आहे. आमच्याकडे मदतीला येतात, पण आम्हाला मदत करण्याची वेळ आली कि विरोधात जातात.  आपल्या पाठीशी लोक असल्याने आपण राजकारणात टिकून आहोत. त्यांचा विश्वास हेच आपले बळ आहे. म्हणून तुमचे आणि आमचे सेम आहे असे म्हणून राणे यांनी आपल्या कौटुंबिक नात्याचा उल्लेख केला.

Web Title: Sangli News Nitesh Rane comment