शिराळा पश्‍चिम भागात गारपीट (व्हिडिआे)

शिवाजीराव चाैगुले
मंगळवार, 17 एप्रिल 2018

कोकरुड - शिराळा पश्‍चिम भागातील कोकरूड, शेडगेवाडी, चरण, पणुब्रे वारुण, आरळा, येळापूर, मेणी, गुडेपाचगणीसह या भागांत काल (सोमवारी) सायंकाळी वारा आणि गारांसह सुमारे एक तासभर पावसाने  हजेरी लावली.

शिराळा - शिराळा तालुका पश्‍चिम भागातील कोकरूड, शेडगेवाडी, चरण, पणुब्रे वारुण, आरळा, येळापूर, मेणी, गुडेपाचगणीसह या भागांत काल (सोमवारी) सायंकाळी वारा आणि गारांसह सुमारे एक तासभर पावसाने  हजेरी लावली. वाऱ्यामुळे रात्री उशिरापर्यंत कोकरूड, बिळाशी, रिळे, फुप्परे आदी परिसरात वीज पुरवठा खंडीत करण्यात आला होता.

सध्या रब्बी हंगामातील काढणी व मळणीची कामे सुरू आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाची धावपळ उडाली. शेतकऱ्यांचे मळणी करून उन्हामध्ये वाळत घातलेले मका, ज्वारीचे धान्य भिजले. त्याबरोबर कडबाही भिजला आहे. मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे.

Web Title: Sangli News Rains in Shirala Taluka