टेंभू योजना येत्या 12 ते14 महिन्यात पूर्ण होईल - संजयकाका पाटील

गणेश जाधव
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

दिघंची - दुष्काळी भागाला विशेषतः सांगली सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरणारी टेंभू योजना येत्या 12 ते14 महिन्यात पूर्ण होईलअसे प्रतिपादन कृष्णा कोरे खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांनी येथे केले.

दिघंची - दुष्काळी भागाला विशेषतः सांगली सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरणारी टेंभू योजना येत्या 12 ते14 महिन्यात पूर्ण होईल व जिहे कटापूर योजनेचे पाणी राजेवाडी तलावात आणण्यासाठी लवकरच ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्यासह एक शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटू असे प्रतिपादन कृष्णा कोरे खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांनी येथे केले

खासदार संजयकाका पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे  टेंभु योजनेला  पहिल्यांदाच 1203.66 एवढा मोठा निधी मिळाल्यामुळे  त्यांचा  दिघंची ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा नागरी सत्कार घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख, जिल्हा पचायत समाजकल्याण सभापती   ब्रह्मानंद पडळकर, आटपाडी पंचायत समिती सभापती हर्षवर्धन देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती

यावेळी बोलताना पाटील म्हणाले टेंभू योजनेचा जन्म होऊन 23 वर्षे झाली आतापर्यंत टेंभू वर 2100 कोटी रुपये खर्च झाले. अजूनही योजना पूर्ण झाले नाही. यासाठी केंद्र सरकारने  मोठा निर्णय घेऊन बाराशे 1203.66 कोटी रुपये एवढा मोठा निधी मंजूर झाला आहे . प्रशासकीय तांत्रिक बाबी पूर्ण करण्याचे युद्धपातळीवर काम सुरू आहे त्या पूर्ण झाल्यावर 1203.066 रुपये एवढा निधी उपलब्ध होणार आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या शिवारात टेंभूचे पाणी मिळणार आहे.

उरमोडीचे पाणी राजवाडी तलावात सोडा, अशी बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र उरमोडीच्या पाण्याचा फ्लो अत्यंत कमी आहे त्यामुळे राजेवाडी तलावात पाणी यायला वेळ लागणार. त्याऐवजी जिहे कटापूर योजनेतून राजेवाडी तलावात लवकर पाणी येईल व खर्च देखील बचत होईल यासाठी जिहे- कटापुर योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांच्या आत शासनाकडन तांत्रिक बाबी पूर्ण करू आत्तापर्यंत 400 कोटी रुपये खर्च झालेत उर्वरित कृष्णा खोरे महामंडळच्या  माध्यमातून सातशे ते साडेसातशे कोटी रुपये केंद्र शासनाकडून मंजूर करून घेऊ, अशी ग्वाही यावेळी दिली.

दरम्यान राजेवाडी उजव्या कालव्याचे काम पूर्ण करावे नदीवरील अपूर्ण बंधारे पूर्ण करावे निंबवडे तलाव टेंभू ने  भरावा वंचित गावांचा टेंभू योजनेत समावेश करावा आदी मागण्या करण्यात आल्या. 

 

Web Title: Sangli News Sanjaykaka Patil comment