शेतकऱ्यांच्या संसारावर  नांगर फिरविण्याचा भाजपचा डाव - सत्यजित देशमुख

शिवाजीराव चाैगुले
मंगळवार, 12 जून 2018

शिराळा - शेतकऱ्यांशी निगडीत असणाऱ्या सर्व यंत्रणा अडचणीत आणून त्यांच्या संसारावर नांगर फिरविण्याचा भाजपचा डाव हाणून पाडा. उद्योगपती, सिनेताराकांना भेटून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नसून कष्टकरी, शेतात राबणाऱ्याना भेटून त्यांना न्याय देणारे निर्णय घ्या, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले.

शिराळा येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी महागाई विरोधी मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळे देशमुख बोलत होते. बिऊर ते शिराळा दरम्यान महागाई विरोधी मोटारसायकल रॅली व एस.टी आगार ते तहसिल कार्यालयपर्यंत मोटारसायकल ढकल मोर्चा व पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ मोटारसायकल तिरडीवर ठेवून तिरडी मोर्चा काढण्यात आला. यात सुमारे २५०० मोटारसायकली तहसिल कार्यालयावर ढकलत आणून सरकारचा पेट्रोल, डिझेल तर दरवाढीविरोधात निषेध नोंदविण्यात आला.

संग्रामसिंह पवार, संदीप जाधव, जयराज पाटील, जयकर कदम, आनंदराव पाटील, संपतराव देशमुख, सत्यजित पाटील, महादेव कदम, सम्राटसिंह शिंदे, हणमंतराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत तानाजी कुंभार तर प्रास्ताविक संभाजी नलवडे यांनी केले. ज्येष्ठ नेते संपतराव देशमुख,, के.डी.पाटील, महादेव कदम, जयराज पाटील, संदीप जाधव, आनंदराव पाटील पंचायत समिती सभापती मायावती कांबळे, हिंदुराव नांगरे आदी उपस्थित होते.

Web Title: Sangli News Satyajeet Deshmukh comment