शुक्राचार्य देवस्थानच्या विकास कामांना प्रारंभ

प्रताप मेटकरी
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

विटा - खानापूर तालुक्यातील घाटमाथ्यावरील श्री शुक्राचार्य हे पवित्र देवस्थान परिसरातील लोकांचे श्रध्दास्थान आहे. एक तीर्थस्थान म्हणून शुक्राचार्य देवस्थानच्या विकासाची कामे करणे हे माझे कर्तव्य समजतो, असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केले.

शुक्राचार्य देवस्थान येथे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्या विशेष प्रयत्नातून देवस्थानची सुधारणा करण्यासाठी सुमारे 24 लक्ष 94 हजार रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शुक्राचार्य देवस्थानचे मठाधिपती कल्याणगिरी महाराज, पंचायत समितीच्या सभापती मनिषा बागल यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुहास बाबर म्हणाले, "शुक्राचार्य देवस्थानची शेकडो वर्षांची  परंपरा आहे. दुष्काळी भागात हे एकमेव आल्हाददायक, निसर्गरम्य व मनःशांती देणारे ठिकाण आहे. या परिसराचा ठेवा जतन करण्याचे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. या स्थळाचे पावित्र्य ठेवून देवस्थान परिसराची सुधारणा करण्यात येईल. शुक्राचार्य येथे होणारी सर्व विकासकामे दर्जेदार केली जातील."

यावेळी राजाभाऊ शिंदे, संभाजी जाधव, बाळासाहेब शिंदे, यशवंत हसबे, सदाशिव हसबे, श्रीरंग इंगळे, चंद्रकांत गायकवाड, पांडुरंग गायकवाड, सुखदेव पडळकर, माजी सरपंच रवी पवार, दत्ता पाटील, शिवसेनेचे विटा शहराध्यक्ष राजू जाधव, समीर कदम, प्रकाश खंदारे, समाधान सावंत उपस्थित होते.

Web Title: Sangli News Shukrachary Devasthan development work starts