Sangli News : आठवडा बाजारात कोंडी; रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे आवश्यक
Sangli News : पायी जाणाऱ्या लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागत आहे. महानगरपालिकेने नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे आवश्यक आहे.
सांगली : येथे शनिवारी आठवडा बाजारात वाहतूक कोंडीची समस्या कायमचीच झाली आहे. शिवाजी मंडईसह पठाण चौक, कापड पेठ, महानगरपालिका, पोलिस स्टेशन, भारती विद्यापीठ या चौकामध्ये वाहतूक कोडींची समस्या नित्याचीच झाली आहे.