विसापूरात विद्यार्थ्यांनी केली पक्ष्यांना चारा-पाण्याची सोय 

लक्ष्मण माने
बुधवार, 21 मार्च 2018

विसापूर - येथील रा. शा. माने-पाटील विद्यालयातील स्काऊट पथकांनी पक्ष्यांना चारा-पाण्याची सोय केली आहे. उन्हामुळे हैराण पक्ष्यांना या उपक्रमाने दिलासा मिळाला आहे.  

विसापूर - येथील रा. शा. माने-पाटील विद्यालयातील स्काऊट पथकांनी पक्ष्यांना चारा-पाण्याची सोय केली आहे. उन्हामुळे हैराण पक्ष्यांना या उपक्रमाने दिलासा मिळाला आहे.  

स्काऊट मास्टर विकास लोखंडे व सहकारी गणेश जगदाळे, यु. एल. वळवी, डी. एन. माने व बाळासाहेब माने, प्राचार्य एम. व्ही. चिवटे, अतुल काळे यांच्या पुढाकारातून उपक्रम राबविण्यात आला आहे.  प्रत्येकाने घरातील टाकाऊ डबे, मोकळ्या बरण्या, बाटल्या गोळा केल्या. यात पाणी, धान्य भरून शाळा परिसरातील झाडावर बांधल्या. 

काही क्षणात अनेक पाखरांनी आस्वाद घेतला. चारा-पाण्यासाठी त्यांचा किलबिलाट वाढला. विद्यार्थ्यांनाही हुरूप आला. उन्हाळी सुट्टीत ही प्रत्येक चार विद्यार्थी चारा-पाण्याची व्यवस्था करणार असे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच प्रत्येकाने अंगणात अशी सोय करण्याचे विद्यार्थ्यांनी निश्चित केले. 

Web Title: Sangli News water and fodder for the birds