चला, धबधबा पाहायला अन्‌ अनुभवायला...

चला, धबधबा पाहायला अन्‌ अनुभवायला...

सांगली - मैत्रिणींनो...तुमच्या दररोजच्या व्यापातून थोडाफार स्पेस अर्थात आनंद देण्यासाठी मधुरांगण परिवारतर्फे एक दिवसाची सहल आयोजित केलीय. सहलीत धबधबा पाहायला व अनुभवायला मिळणार आहे. जंगल सफारीसह निसर्गरम्य पर्यटनाची संधी मिळणार आहे. पाच ऑगस्टला ही सहल सांगलीतून निघेल. तर वेळ नका घालवू. तुमच्या मैत्रिणींसह आज आपलं नाव नोंद करा. 

सांगलीतील तमाम महिलांचं हक्काचं व्यासपीठ बनलेल्या ‘मधुरांगण’तर्फे गेल्या काही महिन्यांत अनेक कार्यक्रम झालेत. मार्गदर्शन कार्यशाळा, मनोरंजन असे कार्यक्रम झाले. आता मधुरांगण परिवारातर्फे निसर्गरम्य पर्यटनाची संधी मैत्रिणींसाठी खुली केलीय. पाच ऑगस्टला सांगलीतून सहल निघेल. सहलीत राधानगरी धरण, काळम्मावाडी धरण, राऊतवाडी धबधबा, हासणे धबधबा, हत्ती महाल आणि मस्त निसर्गरम्य जंगल सफारीचा  आनंद लुटता येणार आहे. सहलीसाठी खास लक्‍झरी बसची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे जीवलग मैत्रिणींसोबत चला एन्जॉय करायला जाऊ. 

सहलीविषयी...

*सहलीसाठी ‘मधुरांगण’ परिवारातील सदस्यांसाठी ११०० रुपये, तर इतर महिलांसाठी १२०० रुपये शुल्क असेल. पाच ऑगस्टला पहाटे पाच वाजता राममंदिर चौकातील ‘सकाळ’च्या सांगली विभागीय कार्यालयापासून सहलीला प्रारंभ होईल. सहलीत दोन वेळचा नाष्टा, एकवेळचे जेवण, सर्व ठिकाणे पाहण्याची शुल्क आणि गाईडची व्यवस्था मधुरांगणकडून करण्यात येणार आहे. रात्री पुन्हा सकाळ कार्यालयाजवळ सोडले जाईल. सहलीला येताना दररोजची औषधे, जंगलात फिरण्यासाठी योग्य असा पोशाख, जादाचे कपडे, पाण्याची बाटली जवळ ठेवावी.

इथं बुकिंग करा...!
सहलीत एन्जॉय करण्यासाठी अनेक मैत्रिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या मिळतोय. इच्छुक महिलांनी बुकिंग तत्काळ करून जागा निश्‍चित करावी. जेणेकरून सहलीसाठी जाणाऱ्या बसची व्यवस्था करणे शक्‍य  होईल. अधिक माहितीसाठी मधुरांगण संयोजिका प्रियांका साळुंखे (९८५०९६७६९६) यांच्याशी संपर्क साधावा. अथवा ‘सकाळ’च्या विभागीय कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत प्रत्यक्ष नोंदणी करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com