लक्ष्मी पूजनानंतर रात्रीच सांगली, मिरजेत मोहीम 

Sangli at night after Lakshmi Puja, Miraj campaign
Sangli at night after Lakshmi Puja, Miraj campaign
Updated on: 

सांगली : दिवाळीच्या पहिल्या दिवशी सायंकाळी लक्ष्मी पूजन मोठ्या उत्साहात पार पडले. शहरातील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर महापालिकेने रात्रीच स्वच्छता मोहीम राबवत बाजारपेठेतील कचरा गोळा केला. सुमारे 12 टन कचरा संकलन करण्यात आला. त्यामुळे आज सकाळी बाजारपेठ चकाचक दिसत होती. 

दिवाळीच्या काळातही स्वच्छतेत कसलीही कमतरता न ठेवता आरोग्य विभाग सतर्क आहे. गेले काही दिवस बाजारपेठेत रात्रीही स्वच्छता केली जात आहे. त्यानुसार लक्ष्मी पूजनानंतर तातडीने आरोग्य विभागाचे कर्मचारी स्वच्छतेच्या कामाला लागले. सांगलीतील मारुती रोड, हरभट रोड, बाजारपेठेतील रस्ते, मिरजेचा मार्केट परिसर आदी ठिकाणी कचरा गोळा करण्यात आला. भाजीपाला, आंब्याची पाने, फुले तसेच केळीची पाने, मोकळे बॉक्‍स, फटाक्‍यांचे कागद याचा समावेश आहे. सांगलीकर दिवाळी करण्यात दंग असताना आरोग्य कर्मचारी घरी दिवाळी करण्यापेक्षा रात्री बारापर्यंत सेवा करीत होते. 

आयुक्त नितीन कापडणीस यांनी बाजारपेठेत होत असलेली गर्दी आणि साचणारा कचरा लक्षात घेऊन रात्रीही स्वच्छतेची सूचना आरोग्य विभागाला दिली होते. त्यानुसार रातोरात रस्ते स्वच्छ करण्यात आले. वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, प्रणिल माने आणि धनंजय कांबळे यांच्यासह 25 कर्मचाऱ्यांनी रात्री स्वच्छता केली.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Miraj Ganesh Visarjan Political Controversy
Bomb Detection Squad Miraj ganeshotsav
Rare Smooth-Coated Otters Spotted in Sangli
Miraj Ganeshotsav 2026
Marathi News Esakal
www.esakal.com