
सांगली : महापालिका क्षेत्रातील इमारती आणि भूखंडाच्या कर निर्धारणासाठी कर मूल्यांकन प्रारूप याद्या जाहीर होत आहेत. खासगी सर्व्हे एजन्सीने केलेल्या सर्वेक्षणावर मालमत्ताधारकांचे अनेक आक्षेप आहेत. एकीकडे मालमत्ता कर विभाग हरकती नोंदवा, म्हणून सांगत आहे; त्याचवेळी हरकत न घेतल्यास सारे काही मान्य आहे, असा युक्तिवादही करीत आहे. प्रत्यक्षात सुमारे दीड लाखांवर मालमत्ताधारकांपर्यंत झालेल्या गोंधळाची नेमकी माहितीच पोहोचलेली नाही. त्यामुळे भविष्यात अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागणार आहे.