
सांगली : कायदेशीर परवान्याशिवाय भारतात घुसखोरी करत सांगलीत वावरणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला सांगली शहर पोलिसांनी अटक केली. आमीर शेख या नावाने बानावट कागदपत्रे तयार केली असून त्याचे मूळ नाव आमीर हुसेन असे आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे तो शहरातील एका लॉजवर वास्तव्यास असल्याचे तपासात समोर आले. शहर पोलिसांच्या सतर्कतेने ही कारवाई करण्यात आली. शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.