सांगली : मिरजेतील शासकीय रुग्णालयातून (Miraj Government Hospital) तीन दिवसांपूर्वी पळवून नेलेले बाळ काल रात्री सापडले. चोरट्या महिलेला पोलिसांनी (Sangli Police) गजाआड करत सावळज येथे कारवाई केली. महात्मा गांधी चौकी पोलिसांना यश आले असून, बाळ सुखरूप आहे. सारा सायबा साठे (वय २४, रा. डोंगरसोनी रस्ता, अल्ताफ गॅरेज पाठीमागे, सावळज, मूळ रा. इचलकरंजी) असे त्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, अपर अधीक्षक रितू खोखर यांनी ते बाळ स्वतः मातेकडे सुपूर्द केले.