सांगली पोलिस मुख्यालयास मिळणार नवी इमारत; एकाच छताखाली सर्व विभाग

Sangli police headquarters to get new building; All sections under one roof
Sangli police headquarters to get new building; All sections under one roof
Updated on

सांगली ः जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, प्रशासकीय इमारतीनंतर आता जिल्हा पोलिस मुख्यालयाची नवी वास्तू उभारण्यात येणार आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्यासमोरील हॉकी मैदानावर तीन मजली इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीच्या उभारणीसाठी 12 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच कामास प्रारंभ केला जाणार आहे. या नव्या इमारतीत एकाच छताखाली पोलिस दलाचे सर्व विभाग येणार आहेत. 


दक्षिण सातारा जिल्ह्याचा सांगली जिल्हा झाला आणि त्याचवेळी विश्रामबाग येथे मुख्यालयाची इमारत मंजूर झाली. 1967 ला येथे इमारत उभारण्यात आली. या इमारतीला सुमारे साडेपाच दशके पूर्ण झाली. दगडी बांधकाम असलेली ही इमारत सद्य:स्थितीत मजबूत आहे. वाढती लोकसंख्या आणि पोलिसांचे विभागांसाठी ही इमारत कमी पडू लागली आहे. यासाठी नूतन पोलिस मुख्यालयाचा प्रस्ताव पोलिस अधीक्षकांनी तयार केला. त्याला मंजूर देण्यात आली आहे. 


ही इमारात अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज असणार आहे. इंटरनेटची साधने, तसेच महापालिका क्षेत्र व इतर ठिकाणची पोलिस ठाणी या मुख्यालयास सीसीटीव्हीने जोडली जाणार आहेत. त्यामुळे अधीक्षकांना तत्काळ पोलिस ठाण्यांशी संपर्क साधता येणार आहे. ही इमारतीत पोलिस दलाची शान वाढविण्याबरोबरच ही वास्तू शहराच्या वैभवात भर घालणार आहे. 

कामास लवकरच प्रारंभ

मुख्यालयाची सध्याची इमारत 50 वर्षांपूर्वीची आहे. नव्या इमारतीसाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यासाठी 12 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सुसज्ज इमारतीत सर्व विभाग एकाच छताखाली येणार आहेत. कामास लवकरच प्रारंभ होईल. 
- दीक्षित गेडाम, पोलिस अधीक्षक, सांगली 


अशी असेल इमारत 

  • तीन मजली इमारत 
  • 54 हजार चौरस फुटांचे बांधकाम 
  • पार्किंगची प्रशस्त सोय 
  • इमारतीसमोर पोलिस स्मृती स्तंभ 


इमारतीत हे विभाग 
पोलिस अधीक्षकांचे कक्ष, अप्पर अधीक्षकांचे कक्ष, गृह उपाधीक्षकांचे कक्ष, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे कार्यालय, कॉन्फरन्स हॉल, सायबर शाखा, महिला सहाय्यता कक्ष, भरोसा सेल, सुरक्षा शाखा, पासपोर्ट विभाग, पोलिस कल्याण शाखा, लिपीक शाखेचे तिन्ही विभाग, आर्थिक गुन्हे शाखा, सीसीटीव्ही कक्ष, कॅन्टीन असेल.

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com