सांगली : मिरजेतील शासकीय रुग्णालयातील (Miraj Government Hospital) प्रसूती विभागातून तीन दिवसांचे अर्भक पळवल्याप्रकरणी पोलिसांनी (Sangli Police) तत्काळ छापेमारी सुरू केली आहे. निपाणीसह सीमाभागात काल रात्री छापेमारी केली. तेथील एका महिलेची माहिती मिळाल्यानंतर त्या महिलेची कसून चौकशी केली; परंतु ती महिला नसल्याचे तपासात समोर आले. दरम्यान, संशयित महिलेचा फोटो पोलिसांच्या हाती लागला असून, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील पोलिस ठाण्यांना पाठविला आहे.