सांगलीत पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू 

शैलेश पेटकर
Wednesday, 12 August 2020

पोलिस दलातील हा पहिला बळी गेल्या खळबळ उडाली आहे. 

सांगली ः कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या 34 वर्षीय पोलिस कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिस दलातील हा पहिला बळी गेल्या खळबळ उडाली आहे. 

मिरज पोलिस ठाण्यातील एका महिला अधिकाऱ्यास कोरोनाची लागण झाल्यानंतर पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा यांनी तातडीने प्रत्येक पोलिस ठाण्यात रॅपिड अँटिजेनची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. त्या तपासणीत तब्बल वीसहुन अधिक पोलिसांनी लागण झाली. त्यानंतर प्रत्येक 48 तासानंतर पोलिसांनी आरोग्य तपासणी करण्यात येत होती. 

कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यातही रॅपिड चाचणीत एकालाही कोरोनाची लागण झाली नव्हती. मृत पोलिस कर्मचाऱ्यास दोन दिवसापूर्वी त्यांना त्रास जाणवू लागल्याने तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवल्यानंतर कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत गेली. रात्रीपासून त्यांची प्रकृती चिंताजनक झाली. आज सकाळी उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला. ते सन 2017 मध्ये कुपवाड औद्योगिक पोलिस ठाण्यात शिपाई या पदावर कार्यरत होते. मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. पोलिस दलातील हा पहिला बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sangli police officer dies due to corona