‘सकाळ’ने ‘स्टिंग ऑपरेशन’ करत ‘सांगलीचा (Sangli Police) उडता पंजाब करायचा आहे का?’ असा सवाल उपस्थित केला होता. त्यानंतर पोलिस अधीक्षक घुगे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.
सांगली : नशामुक्त सांगलीसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टास्क फोर्स (Task Force) स्थापन केल्यानंतर आता विविध कारवायांना गती आली आहे. जिल्हा पोलिसांनी सांगली विभागातील नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या अडगळीच्या जागा अर्थात ‘डार्क स्पॉट’ शोधले आहेत. त्यांची संख्या ५९ आहे. या ठिकाणी नियमित भेटी देणे, पाहणी करण्याचे आदेश बीट मार्शलना देण्यात आले आहेत. महापालिकेने या सर्व ठिकाणी दिवाबत्तीची सोय करून ‘अंधार’ दूर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नशाखोरांच्या अड्ड्यांवर हल्ला करत पोलिसांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.