Sangli political : महाडिकांना शुभेच्छा, जयंतरावांना आव्हान;अण्णा डांगेंच्या भाषणाची शिराळा, इस्लामपूर मतदारसंघात रंगतेय चर्चा

शिराळ्यात एका खासगी कार्यक्रमात अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती होती.
sanagli
sanagli sakal

शिराळा - राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ताकदीच्या शिलेदारांपैकी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांनी शिराळ्यात पोहोचून तेथील भाजपचे संभाव्य उमेदवार सम्राट महाडिक यांचा उल्लेख ‘भावी आमदार’ असा केला. अण्णांनी महाडिकांना शुभेच्छा देताना जयंतरावांना आव्हान दिल्याची चर्चा रंगतेय. कारण, येथे जयंतरावांचे कट्टर समर्थक मानसिंगराव नाईक विद्यमान आमदार आहेत.

शिराळ्यात एका खासगी कार्यक्रमात अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती होती. अण्णासाहेब डांगे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते, माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, माजी मंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे शिराळा विधानसभा निवडणूक प्रमुख सम्राट महाडिक उपस्थित होते. अण्णांनी गुगली टाकली.

अध्यक्षस्थानावरून ते ‘जबाबदारी’ने बोलत होते. शिवाजीराव नाईक, सदाभाऊ खोतांचा उल्लेख केल्यानंतर त्यांनी ‘भावी आमदार सम्राट महाडिक’, असा उल्लेख केला. त्याला गर्दीतून प्रचंड प्रतिसाद मिळाला. टाळ्या पिटल्या गेल्या, शिट्या वाजल्या. सम्राट महाडिक यांनी अण्णांना हात जोडून नमस्कार करत ‘आशीर्वाद फळाला येऊ दे,’ अशा भावना व्यक्त केल्या.

sanagli
Chh. Sambhaji Nagar : खा. इम्तियाज जलील यांच्या पुतळ्यास भरल्या बांगड्या

काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर येथील सभेला अण्णासाहेब डांगे यांनी उपस्थिती लावली होती. जिल्ह्यात जयंतरावांचे बहुतांश बिनीचे शिलेदार त्यांची साथ सोडून जाण्याचे धाडस करताना दिसत नाहीत. अण्णांनी मात्र आपला मूड वेगळा असल्याचे संकेत दिले आहेत. त्याची आधीच चर्चा असताना शिराळ्यात नवा रंग पहायला मिळाला. कोल्हापुरातील उपस्थितीबाबत ‘

अजित पवारांशी आपली जवळची मैत्री आहे. त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो,’ असे त्यांनी सांगितले होते. आज मात्र त्यांनी महाडिकांना आशीर्वाद देताना मानसिंगराव नाईकांना आणि पर्यायाने जयंतरावांनाच आव्हान दिल्याची चर्चा होतेय.

sanagli
Nagpur Flood : पुरामुळे दहा हजार घरांचे नुकसान

बेरजेचे राजकारण

महाडिक गटाच्या चाली तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहेत. राहुल महाडिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेत बेरजेचे राजकारण सुरू केले. पेठनाका येथे अजित पवारांचे जंगी स्वागत केले. जयंतरावांच्या प्रभावाला धक्का देण्यासाठी त्यांची ताकद महत्त्वाची असल्याचे महाडिक यांना पक्के ठाऊक आहे. त्याचवेळी चक्रे उलटी फिरली, सगळी राष्ट्रवादी एक झाली तरी ‘विद्यमान’च्या फेऱ्यात अडचण होऊ नये, आपला पासंगही मजबूत असावा, असाही एक प्रयत्न महाडिक करत आहेत. त्यात अण्णा डांगे यांच्या आशीर्वादाने त्याला बळ मिळाल्याचे महाडिक गटाला वाटते आहे.

sanagli
Kolhapur News : अन् शेतमजुरांचा घडला विमान प्रवास, टाकळीच्या शेतकऱ्याचा स्वखर्चातून उपक्रम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com