संजयकाकांना पुन्हा भाजपमध्ये आपले स्थान निश्चित करायचे आहे आणि चंद्रकांतदादा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे या दोघांचे मनोमिलन महत्त्वाचे होते.
तासगाव : माजी खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांच्या भाजपमध्ये (BJP) परतण्याच्या इच्छेला आज पालकमंत्री तथा भाजपचे प्रमुख नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडून ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला. चंद्रकांतदादांनी चिंचणी येथे श्री. पाटील यांच्या घरी भेट देत त्याबाबतचे स्पष्ट संकेत दिले. लवकरच संजयकाकांची घरवापसी होईल, हे त्यातून स्पष्ट झाले.