अशोक चव्हाणांच्या भाजपप्रवेशाने काँग्रेस-राष्ट्रवादीत धाकधूक; 'या' नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष

शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसलाही (Congress) गळती लागली आहे.
Sangli Politics
Sangli Politicsesakal
Summary

इस्लामपूरचे काँग्रेसनिष्ठ महाडिक घराणेही आता भाजपवासी झाले आहे. आता जिल्ह्यातील दहा तालुक्यांत केवळ दोन ते तीन ठिकाणी काँग्रेसचे अस्तित्व राहिले आहे.

सांगली : शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसलाही (Congress) गळती लागली आहे. हेवीवेट काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan Resigns) यांच्यापाठोपाठ जिल्ह्यातून कोण काँग्रेसला रामराम करणार, याबाबत आता राज्यात चर्चा सुरू झाली आहे. सांगलीत विश्‍वजित कदम (Vishwajeet Kadam) यावर तातडीने खुलशांवर खुलासे करीत आहेत. याआधीच काँग्रेसमधून अनेकजण भाजपमध्ये गेले आहेत. आता आमदार विश्वजित कदम, विक्रमसिंह सावंत आणि विशाल पाटील या युवा चेहऱ्यांकडे भाजपचे लक्ष आहे. त्याचवेळी राष्ट्रवादीतही संशयाचे वातावरण आहे.

Sangli Politics
फुटीनंतरही पश्‍चिम महाराष्ट्रात काँग्रेसचा बालेकिल्ला भक्कम; मोदींची लाट असतानाही जिंकल्या 'इतक्या' जागा

गेल्या वीस वर्षांत काँग्रेसचा बालेकिल्ला एवढा ढासळत गेला की, विधानसभेत कडेगाव-पलूस आणि जत या दोनच मतदारसंघात सध्या काँग्रेसचे अस्तित्व उरले आहे. अशोक चव्हाण यांचे जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांसमवेत चांगले संबंध होते. त्यामुळे त्यांचे पाठीराखे कोण, याबाबत ओघानेच चर्चा सुरू झाली आहे. चव्हाण यांच्याप्रमाणेच ‘अडचणी’त सापडलेले राज्यातील काँग्रेसमध्ये अनेक नेते आहेत. या सर्वांबाबतच आता शंका उपस्थित होत आहेत.

या सर्वांवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी, ‘मोदी हे रिंग मास्टर आहेत आणि विविध पक्षांत जे घोटाळेबाज आहेत, त्या सर्वांना ते नाचवणार,’ असे मार्मिक भाष्य केले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचे भाजपमध्ये जाणे काँग्रेससाठी खूप धक्कादायक आहे. त्यामुळे संघटनात्मक आणि कार्यकर्त्यांच्या पातळीवर प्रतिकूल परिणाम घडू शकतात. कालपासून विश्वजित कदम यांच्यासह अनेकांची नावे काँग्रेसला लागलेल्या या गळतीमध्ये घेतली जात आहेत. काँग्रेसचे येथील संभाव्य लोकसभेचे उमेदवार असलेले विशाल पाटील यांचेही नाव भाजपकडे जाणाऱ्या यादीत अधून-मधून येत असते. प्रत्येक वेळी ते ‘मी कुठे जाणार नाही,’ असा खुलासा करतात. असाच खुलासा चव्हाणही करायचे.

Sangli Politics
विश्वजित कदम, विक्रम सावंत काँग्रेस सोडणार? दोन्ही आमदारांनी स्पष्ट केली भूमिका; म्हणाले, जनतेला विश्वासात घेऊन..

सांगली हा तसा मुळात पहिल्यापासून काँग्रेसचा गड राहिलेला आहे. २०१४ च्या मोदी लाटेत इथे काँग्रेसचा पराभव करून संजय पाटील हे मूळचे काँग्रेसचे, नंतर व्हाया राष्‍ट्रवादी ते भाजपचे दोन वेळा खासदार झाले. २०१९ ला तर आत्मविश्‍वास गमावलेल्या काँग्रेसने राजू शेट्टींच्या स्वाभिमानी पक्षाला सांगलीची जागा सोडून दिली. तेव्हा संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीला देखील टाळे ठोकले होते. वसंतदादांशी निष्ठावान राहिलेले शिवाजीराव देशमुख यांचे चिरंजीव सत्यजित यांनीही भाजपला यापूर्वीच रामराम केला आहे.

इस्लामपूरचे काँग्रेसनिष्ठ महाडिक घराणेही आता भाजपवासी झाले आहे. आता जिल्ह्यातील दहा तालुक्यांत केवळ दोन ते तीन ठिकाणी काँग्रेसचे अस्तित्व राहिले आहे. जिल्हा परिषद, महापालिकेतूनही काँग्रेसची सत्ता संपुष्टात आलेली आहे. मदन पाटील यांच्या निधनानंतर सांगली, मिरज शहरातील काँग्रेस कमकुवत झालेली आहे. त्यांचा वारसा पुढे नेणाऱ्या जयश्री पाटील यांच्याबद्दलही अधून-मधून दुसऱ्या पक्षात जाणार असल्याच्या चर्चा रंगत असतात. एकूणच, काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील कोण-कोण भाजपमध्ये जाणार, याची आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

Sangli Politics
कोकणाप्रमाणंच सांगलीतही सापडल्या अश्मयुगीन संस्कृतीचं दर्शन घडवणाऱ्या 'आदिमानव वस्ती'च्या पाऊलखुणा

आगामी लोकसभेसाठी सांगली मतदारसंघासाठी खरा पेच आहे, तो उमेदवारीचा. भाजपमधूनच विद्यमान खासदारांना विरोध होत आहे. सत्तारूढ भाजपची ही अवस्था, तर काँग्रेस अजूनही लढण्याच्या तयारीत नाही. कारण काँग्रेसमधूनच काही दिग्गज भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने इथे सारेच ‘वेट आणि वॉच’च्या भूमिकेत दिसत आहेत. त्यात, आता भाजपमध्ये आणखी मेगा भरती सुरू झाल्याने काँग्रेसमधील धाकधूक वाढली आहे.

Sangli Politics
Board Exams : दहावी, बारावी परीक्षांवरील बहिष्कार स्थगित; शिक्षणमंत्री, सचिवांशी चर्चेनंतर निघाला तोडगा

राष्ट्रवादीची तीच अवस्था असली तरी सध्या राष्ट्रवादीचा मान्यताप्राप्त अजितदादा गट हा भाजपसोबत महायुतीत आहे. त्यामुळे त्यांच्यातील नेत्यांना सत्तेचं अभय प्राप्त आहे. काँग्रेसलाच नाही, तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील अनेकजण अजितदादांच्या गटात सामील झाल्याने राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यादेखील अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्याबाबतही नेहमीच संशयाचे वातावरण निर्माण होत असते. त्यांची भाजपशी असलेली मैत्री देखील सर्वश्रुत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com