
Vishwajit Kadam & Vishal Patil : सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना काँग्रेसने निलंबित केले होते, मात्र त्यांनी पुन्हा पक्षात परतावे, यासाठी आमदार विश्वजित कदम यांचा प्रयत्न सुरू होता. मात्र त्यात अपयश आले. श्रीमती पाटील यांच्या पक्षांतराने महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठा खड्डा पडला आहे. तो भरून कसा काढायचा, यावर विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यात गुफ्तगु झाले.
भारती मेडिकल कॉलेजमध्ये दोघांनी बराच वेळ चर्चा केली. जुन्यांना रोखायचे आणि नव्या चेहऱ्यांचा शोध घ्यायचा, असे धोरण त्यांनी ठरवल्याचे सांगण्यात आले.