लॉकडाऊनमध्ये सांगली डाक विभाग राज्यात अव्वल; का ते वाचा... 

sangli post.jpg
sangli post.jpg
Updated on

सांगली,  ः जिल्ह्यात 419 शाखांचे जाळे असलेल्या डाक विभागाने लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांना मेडिकल पार्सल्सची पोहोच, मनी ऑर्डर्स,ऍपस्‌च्या माध्यमातून इतर बॅंकेतील खात्यामधून घरपोच पैसे काढण्याची सुविधा, शासकीय योजनांचा लाभसाठी लाभार्थ्यांची नवीन बॅंक खाती, पैसे ट्रान्सफर, विविध शासकीय आस्थापनांची बिल पेमेंट इत्यादी सुविधा सर्वसामान्यांपर्यंत पोहोच केल्या. जिल्ह्यात याचा लाभ आत्तापर्यंत साधारणपणे 57 हजार कुटूंबांनी घेतला असून याव्दारे जवळपास 8 कोटी रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

देशभरात पोस्ट विभागाने केलेल्या या कामाची दखल प्रधानमंत्री कार्यालय तसेच नीती आयोगाने घेतली. या कामात सांगली पोस्ट विभाग महाराष्ट्र सर्कल मध्ये अव्वल ठरला आहे. अशी माहिती सांगली डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक ए. आर. खोराटे यांनी दिली. 

श्री. खोराटे म्हणाले, लॉकडाऊन काळामध्ये केंद्र शासनाने पोस्ट विभागाला अत्यावश्‍यक सेवा म्हणून घोषित केले. खेडोपाडी असलेल्या जाळ्यामार्फत पोस्ट विभागाने विविध प्रकारच्या अत्यावश्‍यक सेवा नागरिकांना घरपोच दिल्या. यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस यांचे वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य लाभले. पोस्ट विभागाने साधारणत: 15 हजार अत्यावश्‍यक मेडिकल पार्सल्स गरजूना पोहोच केल्या. सार्वजनिक वाहतूक बंद असतानाही विशेष टपाल गाडीचे नियेजन करून जिल्हांतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील टपाल यंत्रणा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला.

आर्थिक दुर्बल घटकांना केंद्र शासनामार्फत विविध योजनांतर्गत पैसे त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आले. लॉकडाऊनमुळे हे पैसे बॅंक किंवा एटीएम मध्ये जाऊन काढण्यास अनेक अडचणी येत होत्या. पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंटस्‌ बॅंकेच्या ऍपस्‌ सुविधेव्दारे लाभार्थ्यांना त्यांच्या बॅंक खात्यातील रक्कम काढण्याची सुविधा पोस्टमन मार्फत घरपोच देण्यात आली.  ज्यांची बॅंकेत खाती नाहित अशा 8 हजार जणांची पोस्टात खाती उघडली 


 17 हजार लाभार्थ्यांचे खाते इंडिया पोस्ट पेमेंटस्‌ बॅंकेमार्फत उघडली 
 लॉकडाऊनमध्ये बचत खात्यात 273 कोटी,

  पेन्शन खात्यावरून 5.90 कोटीचे व्यवहार 
 इंडिया पेमेंटस्‌ बॅंकेच्या बचत खात्यावरून 9.20 कोटीचे व्यवहार 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com