सुनंदा इतर महिलांसोबत शेतीपासून पंधरा ते वीस फूट आल्या. घाईत निघताना चप्पल राहिल्याचे लक्षात आले. ते आणण्यासाठी परत गेल्या. चप्पल हातात घेऊन परत फिरल्या असताना अंगावर वीज पडली.
शिराळा : तडवळे (ता. शिराळा) येथे शेतात गेलेल्या सुनंदा पांडुरंग पाटील (वय ४५) यांचा अंगावर वीज (Shirala Rain) पडून मृत्यू झाला. ही घटना काल सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान घडली. पुतण्या सूरज पाटील यांनी शिराळा पोलिसांत (Shirala Police) माहिती दिली.