राम विवाह सोहळ्यात तर सांगलीकर हरवून गेले. त्याचा नाट्यमय सोहळा डोळ्यांचे पारणे फेडणारा होता.
सांगली : जनकपुरात राम-जानकीचा विवाह सोहळा संपन्न झाला. समस्त सांगलीकर या सोहळ्यात जणू वऱ्हाडी नाचावेत असे नाचले, आनंद सोहळा संपन्न झाला. आज वेळ होती, सीतेच्या (Mata Sita) जनकपुरातून प्रस्थानाची... सीता सासरी जाण्याची. जनक राजा आणि त्यांची लाडकी लेक सीता यांच्यात संवाद सुरू होतो... एका बाप-लेकीचा संवाद... समाधान महाराज शर्मा यांच्या वाणीतून तो संवाद ऐकला अन् अंगावर काटा उभा राहिला. सारा मांडव गहिरवला.