
सांगली : ‘मालमत्तेत करपात्र क्षेत्रफळ निम्म्याहून कमी दाखवले. मात्र, घरपट्टी पाच हजारांवरून थेट एक लाख सहा हजार ८४९ वर नेली. जुन्या आणि सुधारित करमूल्य विवरणात तब्बल एक लाखांचा फरक दिसत आहे.’ हे झाले एक उदाहरण. अशीच लाखांची वाढ असलेले प्रकार अनेक मालमत्ताधारकांसोबत झाले आहेत. यंत्रणेने चुका करायच्या आणि आम्ही खेटे का मारायचे, असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत.