Sangli Sakal Anniversary : संतांच्या शब्दांचे सामर्थ्य कृतीत आणा; प्रख्यात वक्ते गणेश शिंदेंची भावनिक साद

‘संतांवर लोकांनी प्रेम केले. कारण, त्यांचे जगणे आणि वागणे एक होते. त्यांच्या जगण्यात सहजता होती. ती आपल्यात आहे का?
Sangli Sakal Anniversary Ganesh Shinde Mogara Phulala Program
Sangli Sakal Anniversary Ganesh Shinde Mogara Phulala Programesakal
Summary

गणेश शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्म ते समाधी प्रवासाचे अनेक पदर उलगडून दाखवताना आजच्या काळाशी त्याचे साधर्म्य जोडून दाखवले.

सांगली : संत ज्ञानेश्वर माऊली (Dnyaneshwar Maharaj) रसाळ शब्दांत जीवनाचा अर्थ सांगून गेले. प्रचंड सामर्थ्य आहे शब्दांत, याचे थोडे भान राखले, तर अनेक अनर्थ टाळता येतील. प्रेम पेरा आणि प्रेमाने जिंका. संतांच्या शब्दांचे सामर्थ्य आत्मसात करा, अशी भावनिक साद घालत रंगलेल्या ‘मोगरा फुलला’ या भक्तिमय संगीत सोहळ्याने (Mogara Phulala Program) आज कृष्णाकाठी सांगलीकरांचे डोळे ओलेचिंब झाले, भावनांचा कल्लोळ माजला आणि भक्तिभावात ‘अवघा रंग एक झाला...’ निमित्त होते ‘सकाळ’ सांगली कार्यालयाच्या ४० व्या वर्धापन दिनाचे (Sangli Sakal Anniversary).

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ओव्या आणि अभंगांवर आधारित ‘मोगरा फुलला’ कार्यक्रमाने हा सोहळा एका वेगळ्या उंचीवर पोहचला. प्रख्यात वक्ते गणेश शिंदे यांचे निरुपण आणि सौ. सन्मिता धापटे-शिंदे यांच्या सुरेल आवाजाने त्यावर चढवलेला साज... असा जवळपास तीन तास मंत्रमुग्ध करणारा सोहळा ‘याचि देही..’ अनुभवताना सांगलीकर तल्लीन झाले.

Sangli Sakal Anniversary Ganesh Shinde Mogara Phulala Program
Loksabha Election : महायुतीचं ठरलं! समरजीत घाटगेंचा आमदारकीचा मार्ग मोकळा, मुश्रीफ कोल्हापुरातून लढवणार लोकसभा?

कधी खळखळून हसले, कधी डोळ्यातून अश्रू धारा लागल्या, तर कधी अंतर्मुख होऊन विचारांत बुडून गेले. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट, हात वर करून धरलेला ताल आणि दोन्ही हात जोडून केलेले विठुरायाचे स्मरण अशा वातावरणात निरुपणकार आणि श्रावक भक्तिरसात न्हाऊन निघाले. ‘बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल’ या भक्तिगीताने या कार्यक्रमाचा पाया घातला आणि ‘मोगरा फुलला’ हे गीत सोहळ्याचा कळस झाले. गणेश शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्म ते समाधी प्रवासाचे अनेक पदर उलगडून दाखवताना आजच्या काळाशी त्याचे साधर्म्य जोडून दाखवले.

‘संतांवर लोकांनी प्रेम केले. कारण, त्यांचे जगणे आणि वागणे एक होते. त्यांच्या जगण्यात सहजता होती. ती आपल्यात आहे का? आपण चिकित्सा करतो का? शब्द म्हणजे शस्त्र, ते जपून वापरतो का? ज्यांनी सगळे लुबाडले, जगणे मुश्किल केले त्यांच्यासाठीही ज्ञानेश्वर माऊली ‘जो जे वांछिल तो ते लाहो’ म्हणतात, आपण कधी शिकणार आहोत हा धर्म? ‘जे खळांचे व्यंकटी सांडो’ या शब्दांच्या अर्थाच्या तळाशी जाऊन त्याच्याशी आपल्या जगण्याला जोडणार आहोत की नाही’, असा सवाल त्यांनी केला.

Sangli Sakal Anniversary Ganesh Shinde Mogara Phulala Program
Mandhardev Kalubai : मांढरदेव-काळेश्वरी देवीचे मंदिर पाच दिवस राहणार बंद; देवस्थान ट्रस्टचा निर्णय, काय आहे कारण?

गणेश यांच्या निरुपणावर सन्मिता यांच्या सुरेल आवाजाचा साज चढला. ‘अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग’, ‘या पंढरपुरात पाय वाजतगाजत, सोन्याचे बाशिंग लगीन देवाचे लागते’, ‘अनादी निर्गुण प्रकटली भवानी, आईचा जोगवा जोगवा मागेन’, या गीतांनी रसिकांना मुग्ध केले. त्यांना भागवत ढोले (हार्मोनियम), सचिन इंगळे (पखवाज), अभिषेक पवार (तबला), विश्वनाथ गोसावी (पियानो), नरेंद्र काळे (साईड रिदम) तसेच सहगायिका वैष्णवी सोनार, प्रतीक्षा दुडे यांनी साथसंगत केली.

Sangli Sakal Anniversary Ganesh Shinde Mogara Phulala Program
'वंचित' बरखास्त करून प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावं, अध्यक्षपदासह माझं मंत्रिपद देईन; आठवलेंची खुली ऑफर

तत्पूर्वी सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांनी प्रास्ताविक केले. ‘आपल्यासारख्या पाठीराख्यांमुळे चार दशके सकाळ सांगलीत रुजला आहे. चुकते त्याच्या पाठीत रट्टा आणि जो बरोबर त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप ही भूमिका राहिली आहे. बातम्यांच्या पुढे जाऊन सकाळ कृतिशीलता जपतो’, असे त्यांनी सांगितले. सहयोगी संपादक शेखर जोशी यांनी स्वागत केले. ‘समाजात बदल घडावा, यासाठी सकाळ आग्रही राहिला आहे. कवलापूरचे विमानतळ ते थेट चांदोलीतून पाणी, कृष्णा नदीचे प्रदूषण या विषयांवर सकाळने भूमिका घेतली आहे’, असे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com