Sangli Student Auto : एका रिक्षात दहा ते बारा विद्यार्थी; धोकादायक वाहतुकीला मुभा? वर्षभरात एकच कारवाई
Safety in Sangli : सांगली शहरात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहतुकीबाबत धक्कादायक चित्र समोर येत आहे. तीन आसनी रिक्षांमध्ये तब्बल १० ते १२ विद्यार्थ्यांना कोंबून शाळेत नेले जात असल्याचे प्रकार सर्रास दिसत आहेत. काही रिक्षांमध्ये अनधिकृत पद्धतीने आसन व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
सांगली : तीनआसनी रिक्षात दहा ते बारा विद्यार्थी कोंबले जातात. आसन व्यवस्थेत अनधिकृत पद्धतीने बदल केला जातो. मात्र, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या वाहनधारकांना चाप लावण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नाही.