सांगली शिक्षक बॅंकेककडून 30 जणांना कर्जमाफी; मृत शिक्षकांचे सव्वादोन कोटींचे कर्ज माफ

Sangli Shikshak Bank offers loan waiver to 30 people; Debt waiver of Rs 12 crore for dead teachers
Sangli Shikshak Bank offers loan waiver to 30 people; Debt waiver of Rs 12 crore for dead teachers
Updated on: 

सांगली : घर बांधणीसाठी शिक्षकांनी कर्ज घेतले. कर्जाचा डोंगर अजून डोक्‍यावर असताना मृत्यूने गाठले. कुटुंबावर संकट कोसळणार, अशी स्थिती होती. परंतु, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या एका धोरणाने त्यांना मृत्यूनंतर कर्जमुक्त केले. 30 जणांची 2 कोटी 30 लाख रुपये माफ करण्यात आले. त्या कुटुंबांकडे आता बॅंकेचे एक रुपयाचेही देणे नाही. 

शिक्षक बॅंकेने कर्जदारांसाठी घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयाने 30 कुटुंबे उद्‌ध्वस्त होण्यापासून वाचली आहेत. या धोरणात कर्जदाराचा जर मृत्यू झाला, तर त्याच्या डोक्‍यावरील कर्जापैकी जास्तीत जास्त 20 लाख रुपये माफ केले जाते. त्या

हून कमी कर्ज असेल, तर ते शंभर टक्के माफ होते. जर सभासद मृत्यू झाला आणि त्याचे कर्ज नाही; तर त्यांच्या कुटुंबीयांना तीन लाख रुपयांची मदत केली जाते. महाराष्ट्रात अशा पद्धतीने कर्जमाफी देणारी बहुदा ही एकमेव बॅंक असावी. 

अध्यक्ष सुनील गुरव म्हणाले, ""या धोरणाचा निर्णय झाल्यापासून तीस कर्जदार शिक्षकांचा मृत्यू झाला. त्यांचे एकूण 2 कोटी 30 लाख रुपयांचे कर्ज आम्ही माफ केले.

त्यात 19 लाख 15 हजार 165 रुपये हे सर्वाधिक कर्ज होते. 5 लाख 64 हजार रुपये हे छोटे कर्ज होते. या तीन कुटुंबांना आता आधार मिळाला आहे. त्यांच्या डोक्‍यावर कसलेही कर्ज नाही.''

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Koyna Dam additional water demand for Sangli
Sangli District Bank Election Strategy
Woman Allegedly Extorted of ₹17 Lakh
Gopichand Padalkar sangli jilha bank
Marathi News Esakal
www.esakal.com