Shirala Nag Panchami : शिराळ्यात नागपंचमीचा उत्साह; वनविभागाच्या देखरेखीखाली 41 ठिकाणी जिवंत नागांचे दर्शन; पांढरा नाग ठरला मुख्य आकर्षण

Shirala Nag Panchami 2026 Celebrations : शिराळ्यात नागपंचमी उत्साहात साजरी झाली. हजारो भाविकांनी अंबामाता मंदिरात दर्शन घेतले. वन विभागाच्या देखरेखीखाली ४१ ठिकाणी जिवंत नागदर्शन झाले, तर ६०० पोलिसांचा बंदोबस्त होता.
Shirala Nag Panchami 2026

Shirala Nag Panchami 2026

esakal

Updated on

शिराळा : शिराळ्याच्या मातीत रुजलेली नागपंचमीची श्रद्धा, डोळ्यांत नागदर्शनाची उत्सुकता आणि मनात सर्पसंवर्धनाचा संदेश घेऊन हजारो भाविकांनी आज शिराळ्याची वाट (Shirala Nag Panchami 2026) धरली. वर्षानुवर्षांची परंपरा आणि आधुनिक संवर्धनाची जाणीव यांचा अनोखा संगम यंदाच्या नागपंचमीत पाहायला मिळाला. वन विभागाच्या देखरेखीखाली ४१ ठिकाणी जिवंत नागांचे दर्शन घडताच भाविकांच्या चेहऱ्यावर कुतूहल, श्रद्धा आणि आनंदाचे भाव उमटले. मिरवणुकीत तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग लक्षवेधी ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com