Takari Mhaisal water supply update
esakal
सांगली : ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे पंप काल सायंकाळी सुरू करण्यात (Mhaisal irrigation scheme latest update) आले. त्यामुळे दुष्काळी स्थितीत सिंचन योजना लाभक्षेत्राला दिलासा मिळणार आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत नियोजन करण्यात आले होते. ताकारी योजनेचे तीन पंप काल सायंकाळी सुरू करण्यात आले. तासगाव आणि कडेगाव तालुक्यांत रब्बी पिकांसाठी हे आवर्तन सुरू करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता प्रज्ञा पाटील यांनी सांगितले.