Tasgaon Solar Project
esakal
तासगाव (सांगली) : बलगवडे (ता. तासगाव) येथील गायरानातील आठ हेक्टर क्षेत्रात सौर ऊर्जा प्रकल्पाचे (Tasgaon Solar Project) काम सुरू आहे. प्रकल्पासाठी गायरानातील १२ हजारांहून अधिक झाडांची पोलिस बंदोबस्तात कत्तल सुरू आहे. ग्रामस्थांचा प्रकल्पाला विरोध आहे. प्रशासन प्रकल्पाचे काम रेटत आहे, तर रस्त्यासाठी झाड तोडल्यानंतर टाहो फोडणारे पर्यावरणप्रेमी वृक्षतोड होत असताना गप्प असल्याचे चित्र आहे.