Turmeric Market : आखाती युद्धाचा सांगलीच्या हळद बाजारावर मोठा फटका; निर्यात ठप्प, दरात मोठी घसरण
Gulf Conflict : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता सांगलीच्या हळद बाजारालाही बसू लागला आहे. कतार, दुबई आणि इराणसारख्या आखाती देशांकडे होणारी निर्यात अचानक ठप्प झाल्याने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे.
सांगली : आखातात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम सांगलीच्या हळद बाजारावर झाला आहे. मुंबईमार्गे होणारी निर्यात पूर्णपणे ठप्प झाल्याने हळदीच्या दरात घसरण झाली आहे.