Fresh turmeric stock arriving at Sangli market yard during new season trading.
sakal
पश्चिम महाराष्ट्र
Sangli Turmeric : राजापुरी हळदीच्या दराने गाठला उच्चांक; यंदाचा हंगाम फायदेशीर ठरण्याचे संकेत
Turmeric Prices Surge : सांगलीतील वसंतदादा मार्केट यार्डात नवीन हंगामातील हळदीच्या सौद्याला उत्साहात सुरुवात झाली असून, पहिल्याच दिवशी उच्चांकी दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वसंतदादा मार्केट यार्डात नवीन हंगामातील राजापुरी हळदीच्या सौद्याला उत्साहात सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी उच्चांकी दर मिळाल्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.

