

Sangli Hit by Heavy Rain and Hailstorm, Crops Damaged Across District
esakal
सांगली जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये रविवारी सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. तासगाव तालुक्यातील गोटेवाडी येथे गारांसह पाऊस पडल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. तासगाव, कवठेमहांकाळ तालुका आणि सांगली शहरासह मिरज, वाळवा परिसरातही जोरदार पावसानं हजेरी लावली. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने काहीसा दिलासा दिला, मात्र शेतीपिकांसाठी तो संकट ठरला आहे.